Shubman Gill Latest News
Shubman GillTwitter

Shubman Gill: शुबमन गिलने विराट कोहलीचा विक्रम मोडला! टीम इंडियासाठी 'हा' कारनामा करणारा ठरला दुसरा खेळाडू

झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणाऱ्या शुबमन गिलने इतिहास रचला आहे. टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुबमनने अर्धशतकीय खेळी केली.
Published by :
Naresh Shende
Published on

Shubman Gill Broke Virat Kohli Record: झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणाऱ्या शुबमन गिलने इतिहास रचला आहे. टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुबमनने अर्धशतकीय खेळी केली. गिलने ४९ चेंडूंमध्ये १३४.६९ च्या स्ट्राईक रेटने ६६ धावांची जबरदस्त खेळी साकारली. त्यामुळे गिल टीम इंडियासाठी टी-२० फॉर्मेटमध्ये अर्धशतक ठोकणारा दुसरा सर्वात युवा कर्णधार बनला आहे.

शुबमन गिलच्याआधी विराट कोहलीने हा कारनामा केला होता. विराट २८ वर्षांचा असताना टीम इंडियाचं नेतृत्व करत होता. त्यावेळी २०१७ मध्ये श्रीलंकेविरोधात त्याने अर्धशतक ठोकलं होतं. परंतु, गिलने कोहलीचा विक्रम मोडला आहे. युवा फलंदाजाने २४ वर्षांचा असताना टीम इंडियाचं नेतृत्व करत झिम्बाब्वेविरोधात अर्धशतक केलं आहे.

पहिल्या स्थानावर भारतीय संघाचा माजी स्टार क्रिकेटर सुरेश रैनाचा बोलबाला आहे. रैनाने २०१० मध्ये झिम्बाब्वेविरोधात भारतीय संघाचं नेतृत्व करत अर्धशतक ठोकलं होतं. रैना त्यावेळी २३ वर्षांचा होता. झिम्बाब्वेविरोधात झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात शुबमन गिलने ६६ धावांची खेळी केली. यामध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com