नेमबाज, प्रशिक्षक मोनाली गोऱ्हेंचे कोरोनाने निधन

नेमबाज, प्रशिक्षक मोनाली गोऱ्हेंचे कोरोनाने निधन

Published by :
Published on

भारताच्या युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा नेमबाज संघाच्या प्रशिक्षक आणि शूटर मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, सकाळीच त्यांच्या वडिलांचेही कोरोनामुळे निधन झालं. त्यांच्या या निधनाने क्रीडा क्षेत्रात तसेच नाशिकमध्ये शोककळा पसरली आहे.

मोनाली गोऱ्हे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरातील सदस्यांची कोरोनाची चाचणी घेतली होती. त्यांच्या वडिलांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर नाशिक शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण, आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं. मोनाली यांच्यावर सुद्धा उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, दुपारी त्यांनीही प्राण सोडले. पित्यापाठोपाठ मोनाली यांचाही मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोनाली गोऱ्हे या भारताच्या युवा नेमबाज संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक होत्या. तसंच श्रीलंकेच्या नेमबाज संघाच्या त्या प्रशिक्षक सुद्धा होत्या. नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा तज्ञ कै.भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते. क्रीडा प्रशिक्षक मोनाली यांच्या निधनामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे..

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com