Shaheen Afridi | Asia Cup 2022
Shaheen Afridi | Asia Cup 2022team lokshahi

आशिया चषकापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर

28 ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान सामना
Published by :
Shubham Tate
Published on

asia cup 2022 : आशिया चषक सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. गाले येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना शाहीनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. यानंतर, ताज्या स्कॅन अहवालानंतर, पीसीबीच्या वैद्यकीय सल्लागार समितीने शाहीन आफ्रिदीला 4-6 आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. (shaheen afridi ruled out asia cup 2022 paksitani fast bowler india vs pakistan)

आशिया चषकाशिवाय शाहीन आफ्रिदीला इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही खेळता येणार नाही. पण ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकापूर्वी तो मैदानात परतण्याची अपेक्षा आहे.

Shaheen Afridi | Asia Cup 2022
गौतम अदानींची आणखी एक कंपनी 7017 कोटींना विकत घेण्याची घोषणा

PAK टीम 22 ऑगस्टला दुबईला पोहोचेल

डॉ नजीबुल्ला म्हणाले, "पीसीबीचे क्रीडा आणि व्यायाम औषध विभाग आगामी आठवड्यात शाहीनचे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सुरक्षित पुनरागमन सुनिश्चित करण्यासाठी त्याच्याशी जवळून काम करेल." शाहीन आपले पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी संघासोबत असेल. आशिया चषकासाठी शाहीनच्या बदलीची घोषणा लवकरच केली जाणार आहे. पाकिस्तानी संघ सोमवारी (२२ ऑगस्ट) रॉटरडॅमहून दुबईला पोहोचणार आहे.

Shaheen Afridi | Asia Cup 2022
Parle-G च्या या निर्णयाचं होतंय कौतुक, कंपनीचे नुकसान होईल का?

भारताविरुद्धच्या विजयात स्टार होता

शाहीन आफ्रिदीने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या भारताविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुरुवातीलाच शाहीनने रोहित शर्मा आणि केएल राहुलला बाद करून भारतीय संघाला दुहेरी धक्का दिला. नंतर त्याने विराट कोहलीलाही चालायला लावले. शाहीन आफ्रिदीच्या शानदार कामगिरीमुळे पाकिस्तान संघाने तो सामना 10 गडी राखून जिंकला.

28 ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान सामना

27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप 2022 मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी श्रीलंका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर सहावा आणि अंतिम संघ पात्रता स्पर्धेनंतर निश्चित होणार आहे. टीम इंडिया 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com