Virender Sehwag
Virender SehwagTeam Lokshahi

...म्हणून पोलार्ड, रोहीतला बाहेर बसवण्याची वेळ आली; सेहवागने स्पष्टच सांगितलं

सर्वांत आधी स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की मुंबई इंडियन्सच्या संघावर ओढावली आहे.
Published by :
Vikrant Shinde
Published on

IPL या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्व हंगामांचा विचार करता सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कारण म्हणजे मुंबईच्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक अर्थात 5 वेळा जेतेपद पटकावलं आहे. या हंगामात मात्र, सर्वांत आधी स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघावर ओढावली आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाला अजुनही सुर गवसलेला दिसला नाही.

आता मुंबईच्या संघाची सुरूवात कडवट झाली असली तरी निदान या हंगामाचा शेवट तरी मुंबईच्या संघासाठी गोड व्हावा असा मुंबईच्या संघाचा प्रयत्न असणार आहे. तसेच आता मुंबईच्या संघाला यंदाच्या हंगामात जिंकण्याची आशा उरलेली नाही त्यामुळे आता नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याविषयी बोलताना माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) एक वक्तव्य केलं आहे.

Virender Sehwag
अर्जून तेंडूलकर मुंबईच्या संघात खेळताना दिसणार? मुंबईचे हेड कोच म्हणाले...

काय म्हणाला सेहवाग?

"मुंबईने सर्व सिनिअर खेळाडूंना आराम देण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही. मुंबईने पुढील हंगामासाठी तयारी सुरु करायला हवी. बेंच स्ट्रेंथ तपासण्यासाठी रोहित शर्मा, पोलार्ड आणि बुमराह यासारख्या खेळाडूंना आराम देण्याची गरज आहे." असं वक्तव्य एका वेब साईटशी बोलताना सेहवागने केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com