अर्जुनच्या आयपीएल पदार्पणावर सचिन भावूक; मास्टर-ब्लास्टरची हृदयस्पर्शी नोट व्हायरल
आयपीएल 2023 च्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या टीमने कोलकाता नाईट रायडर्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदा खेळताना दिसला. अर्जुनने या सामन्यातील पहिले षटकही टाकले. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अर्जुनला त्याच्या आयपीएल पदार्पणासाठी शुभेच्छा दिल्या. तर सचिनने अर्जुनच्या पदार्पणावर एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे.
सोशल मीडियावर अर्जुनसोबतचे दोन फोटो पोस्ट करताना सचिन तेंडुलकरने लिहिले की,अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहेस. तुझ्यावर प्रेम करणारे आणि खेळावर प्रेम करणारे तुझे वडील म्हणून. मला माहित आहे की तू खेळाला योग्य तो सन्मान देशील आणि खेळ तुम्हाला तो सन्मान परत देईल. तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही असेच करत राहाल. ही एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. शुभेच्छा!
तत्पुर्वी, कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत मुंबई इंडियन्सने हा सामना पाच विकेटने जिंकला आहे. या सामन्यात मुंबईने कोलकाताकडून दिलेले १८६ धावांचे लक्ष्य १७.४ षटकांत ५ गडी गमावून सहज गाठले. अर्जुनने सुरुवात करतानावेगवान गोलंदाजाने पहिल्याच षटकात पाच धावा दिल्या. त्याने जगदीशनविरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केले पण पंचांनी ते फेटाळून लावले. अर्जुनने या सामन्यात एकही विकेट न घेता 2 षटकात 17 धावा दिल्या.
दरम्यान, २३ वर्षीय अर्जुन गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. 2021 च्या लिलावात त्याची निवड झाली पण दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. 2022 च्या लिलावातही त्याची निवड झाली होती पण गेल्या वर्षी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा रविवारी संपुष्टात आली. आयपीएल खेळणारी सचिन आणि अर्जुन ही पिता-पुत्राची पहिली जोडी आहे.