सचिनची कोहलीच्या 'विराट' विक्रमावर खास प्रतिक्रिया; तू माझ्या पाया पडलास, तेव्हा...

सचिनची कोहलीच्या 'विराट' विक्रमावर खास प्रतिक्रिया; तू माझ्या पाया पडलास, तेव्हा...

न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आहे. यासाठी सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे खास अभिनंदन केले आहे.
Published on

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आहे. यासोबत विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. यामध्ये कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. तर, सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटने आपल्या नावे केला आहे. यासाठी सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे खास अभिनंदन केले आहे.

सचिनची कोहलीच्या 'विराट' विक्रमावर खास प्रतिक्रिया; तू माझ्या पाया पडलास, तेव्हा...
भारतानं उभारला धावांचा डोंगर; न्यूझीलंडला विजयासाठी 'एवढ्या' धावांचं आव्हान

सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया पोस्टद्वारे कोहलीचे अभिनंदन केले आहे. जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये भेटलो तेव्हा संघातील इतर खेळाडूंनी माझ्या पायाला हात लावल्याची खिल्ली उडवली. त्या दिवशी मला हसू आवरता आले नाही. पण, तू तुझ्या उत्कटतेने आणि कौशल्याने लवकरच माझ्या हृदयाला स्पर्श केलास.

तरुण मुलगा 'विराट' खेळाडू झाला आहे याचा मला खूप आनंद आहे. एका भारतीयाने माझा विक्रम मोडला यापेक्षा मी आनंदी होऊ शकत नाही आणि तोही त्याच्या घरच्या मैदानावर वर्ल्ड कप सेमीफायनल सामना खूप खास आहे, अशा भावना तेंडुलकरने व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 4 गडी गमावून 397 धावा केल्या. विराट कोहलीने शानदार शतक झळकावले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com