रोहित शर्मा तोडणार रिकी पाँटिंगचा ऐतिहासिक विक्रम? केवळ एक पाऊल दूर

रोहित शर्मा तोडणार रिकी पाँटिंगचा ऐतिहासिक विक्रम? केवळ एक पाऊल दूर

IND vs END T20 Series 49 आणि 50 अशा मोठ्या फरकाने दोन सामने जिंकले आहेत. यानंतर आता रोहित शर्माला ऐतिहासिक विक्रम बनविण्याची संधी आहे.
Published on

कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आज भारतीय संघ इंग्लंडविरुध्द (IND vs END) टी-20 सिरीजमधील (T20 Series) अखेरचा सामना खेळणार आहे. याआधीचे दोन सामने भारताने आपल्या खिशात घातले असून 49 आणि 50 अशा मोठ्या फरकाने जिंकला आहे. यानंतर आता रोहित शर्माला ऐतिहासिक विक्रम बनविण्याची संधी आहे.

रोहित शर्मा तोडणार रिकी पाँटिंगचा ऐतिहासिक विक्रम? केवळ एक पाऊल दूर
IND VS PAK : भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; सर्व तिकीटे बुक

इंग्लंड दौऱ्यात टी-20 सिरीजनंतर वनडे सामना खेळण्यात येणार आहेत. अशात रोहित शर्माजवळ सलग सर्वात जास्त इंटरनॅशल मॅच जिंकण्याचा विक्रम बनवण्याची संधी आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली सलग 19 इंटरनॅशल सामन्याध्ये भारतीय संघ विजयी झाला आहे.

रोहित शर्माने आजचा अखेरचा टी-20 सामना जिंकला. तर तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंगची बरोबरी करेल. यानंतर वन डे सिरीजमधील पहिला सामना जिंकताच रोहित शर्मा रिकी पॉंटिंगचा विक्रम तोडेल. रिकी पॉंटिंगने आतापर्यंत 20 सामना सलग जिंकल्याचा विक्रम बनविला आहे. हा विक्रम 19 वर्ष आधी म्हणजेच 2003 साली झाला होता. यानंतर कोणीही त्यांच्या विक्रमपर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु, रोहित शर्मा या ऐतिहासिक विक्रमपासून केवळ एक पाऊल दूर आहे.

सलग सामना जिंकलेले कर्णधार

20 - रिकी पोंटिंग (2003)

19 - रोहित शर्मा (2019/22)*

16 - रिकी पोंटिंग (2006/07)

दरम्यान, रोहित शर्माने नुकताच आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना जिंकताच सलग 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा टी-20 मालिकेत क्लीन स्वीप दिला. तर वन-डेत वेस्ट इंडिज आणि कसोटीत श्रीलंकेचा क्लीन स्वीप दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com