IND vs ENG : धरमशाला मैदानात कर्णधार रोहित शर्माची ग्रॅंड एन्ट्री, हेलिकॉप्टरचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Rohit Sharma Helicopter Video Viral : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून अखेरचा सामना गुरुवारी ७ तारखेला धरमशाला येथे रंगणार आहे. परंतु, भारताचा कर्णधार रोहित शर्माची या कसोटी सामन्याआधीच सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. कारण या पाचव्या कसोटीसाठी रोहितने मैदानात ग्रँड एन्ट्री केली आहे. हेलिकॉप्टरने उड्डाण घेत रोहित मंगळवारी हिमाचल प्रदेशच्या धरमशाला मैदानात पोहोचला. रोहितचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून क्रीडाविश्वात चर्चाही रंगली आहे.
भारत इंग्लंडविरुद्ध झालेला पहिला सामना पराभूत झाला. परंतु, विशाखापट्टनम, राजकोट आणि रांचीत झालेल्या सामन्यात भारताने सलग तीन विजय संपादन केले आणि ३-१ ने आघाडी घेत ही कसोटी मालिका खिशात घातली. दरम्यान, भारत विश्व चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर इंग्लंड आठव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. कारण अश्विन धरमशाला येथे १०० वा कसोटी सामना खेळणार असून दिग्गज अनिल कुंबळेचा विक्रम मोडण्याची त्याला संधी आहे.
धरमशाला कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), के एस भरत (विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.