Rohit Sharma latest News
Rohit SharmaGoogle

सलामी फलंदाज म्हणून 'हिटमॅन'ने केला मोठा कारनामा! रोहित शर्माने ठोकले ३०० षटकार, विश्वविक्रमाला घालणार गवसणी

श्रीलंके विरुद्ध पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज फलंदाजी करुन अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर आज कोलंबोत रंगत असलेल्या दुसऱ्या सामन्यातही रोहितने आक्रमक फलंदाजी करून ६४ धावा कुटल्या.
Published by :
Naresh Shende
Published on

Rohit Sharmas 300 sixes as an opner in ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज फलंदाजी करुन अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर आज कोलंबोत रंगत असलेल्या दुसऱ्या सामन्यातही रोहितने आक्रमक फलंदाजी करून ६४ धावा कुटल्या. रोहितने या इनिंगमध्ये दुसरा षटकार ठोकून वनडे फॉर्मेटच्या करिअरमध्ये ३०० षटकार ठोकण्याची कामगिरी केलीय. टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा कारनामा दुसरा सलामी फलंदाज ठरला आहे.

सलामी फलंदाज म्हणून रोहित शर्माने ठोकले ३०० षटकार

भारताचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात षटकारांचा पाऊस पाडतो. श्रीलंका विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यातही रोहितने गगनचुंबी षटकार मारून वनडे क्रिकेटमध्ये ३०० षटकार ठोकण्याचा कारनामा केला आहे. रोहितने त्याच्या करिअरच्या २६४ वा सामना आणि २५६ इनिंगमध्ये ही कामगिरी केलीय.

रोहित शर्मा विश्वविक्रमाला गवसणी घालणार?

सलामी फलंदाज म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम वेस्टइंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानंतर रोहित शर्माच्या नावाची नोंद झालीय. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गेलच्या नावावर वनडे कारकिर्दीत ३२८ षटकारांची नोंद आहे. तर रोहितने आतापर्यंत ३०० षटकार ठोकले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्मा टीम इंडियाकडून खेळणार असल्याचं बीसीसीआय सचिव जय शहा यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे रोहित शर्माला वनडे क्रिकेटमध्ये ख्रिस गेलच्या नावावर असलेला विक्रम मोडण्याची संधी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com