Rishabh Pant
Rishabh Pant Team Lokshahi

झोप लागल्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे रिषभ पंतचा अपघात

डीडीसीएचे संचालक शायम शर्मा यांच्याशी बोलत असताना ऋषभ पंतने अपघाताबाबत नवा खुलासा केला
Published by :
Sagar Pradhan
Published on

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघाताच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. शुक्रवारी सकाळी ऋषभ पंतच्या कारला अपघात झाल्याची बातमी आली. त्यानंतर पंतप्रधानांपासून तर अभिनेत्यांपर्यंत सर्वांनी या अपघाताची दाखल घेतली होती. मात्र, अपघाताचं नेमकं कारण काय आहे? हे माहित नव्हतं आता ते कारण समोर आले आहे.

रुरकी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सध्या पंत देहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे. याठिकाणी त्याला भेटण्यासाठी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA) ची टीम पोहोचली आहे. यावेळी डीडीसीएचे संचालक शायम शर्मा यांच्याशी बोलत असताना ऋषभ पंतने अपघाताबाबत नवा खुलासा केला आहे. पंत म्हणाला की, “गाडी चालवत असताना समोर एक खड्डा आला. खड्डा वाचवत असताना हा अपघात झाला.” असे त्यानी सांगितले आहे.

श्याम शर्मा यांनी ऋषभ पंतला अपघाताचे कारण विचारले होते. यावेळी त्यांना उत्तर देत असताना पंत म्हणाला की, रात्रीची वेळ होती. समोर खड्ड्यासारखं मला काहीतरी दिसलं. म्हणून खड्डा वाचविण्याचा प्रयत्न मी केला. त्यामध्ये हा अपघात झाला.” श्याम शर्मा यांनी पुढे सांगितले की, सध्यातरी ऋषभ पंतच्या पुढीला उपचारासाठी त्याला एअरलिफ्ट करण्याची गरज नाही. त्याला दिल्लीला हलविले जाणार नाही. लेगामेंट उपचारासाठी जर लंडनला जायचे असेल तर त्याचा निर्णय बीसीसीआय घेईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com