IPL 2024
IPL 2024

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

आरसीबीने अतितटीच्या या सामन्यात २७ धावांनी चेन्नईचा पराभव करून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Published by :
Naresh Shende
Published on

RCB Record vs CSK IPL 2024: आरसीबीने आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक २०० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रमात मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे. आरसीबीने सीएसकेविरोधात २० षटकांमध्ये २१८ धावा करून ५ विकेट्स गमावल्या. या हंगामात आरसीबीचा २०० हून अधिक धावांचा सहावा स्कोअर आहे. आरसीबीने मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांची बरोबरी केली आहे. याचसोबत आरसीबीने एकाच टी-२० टूर्नामेंटमध्ये १५० षटकार ठोकणारा पहिला संघ बनला आहे. आणखी १६ षटकारांच्या मदतीने आरसीबीने सनरायजर्स हैदराबादच्या १४६ षटकारांना मागे टाकून १५० षटकारांचा आकडा गाठला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलचा ६८ वा सामना चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला. आरसीबीने अतितटीच्या या सामन्यात २७ धावांनी चेन्नईचा पराभव करून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. चेन्नईचा पराभव केल्यानं आरसीबी प्ले ऑफमध्ये क्लालिफाय करणारा चौथा संघ ठरला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादने प्ले ऑफ मध्ये जागा पक्की केली आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या (५४) धावांच्या जोरावर आरसीबीला २१८ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी मैदानात उतरलेल्या सीएसकेला २० षटकांमध्ये ७ विकेट्स बाद करून १९१ धावांवर रोखलं. सीएसकेचा पराभव करून आरसीबीने लगातर सहाव्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

सीएसकेसाठी रचिन रविंद्र (६१ धावा, ३७ चेंडू, ५ चौकार आणि ३ षटकार) आणि रविंद्र जडेजा (नाबाद ४२ धावा), तसंच एम एस धोनीनं २५ धावा केल्यानंतरही सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीसाठी यश दयालने ४२ धावा देत दोन विकेट घेतल्या आणि शेवटच्या षटकात सीएसकेला १७ धावा करण्यात रोखलं. त्यामुळे आरसीबीला या सामन्यात विजय मिळवता आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com