Tokyo 2020 : सुवर्णपदक हुकलं; रवी दहियाला रौप्यपदक
टोकिओ ओलीम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात रवीकुमार दहियाचा पराभव झाला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी 7-4 च्या फरकाने पराभूत झाला. प्रतिस्पर्धी जावूर युगुयेवने अप्रतिम कमागिरी करत सुवर्णपदक जिंकलं. तर रवीच्या पदरात रौप्यपदक पडलं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात अजून एक पदकाची नोंद झाली आहे.
रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा सामन्यातूनच बाहेर फेकले होते. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला. त्यामुळे रवीने नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर आज कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियाच्या जावूर युगुयेवशी झाला. पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ने जिंकली. प्रतिस्पर्धी जावूर युगुयेवने अप्रतिम कमागिरी करत सुवर्णपदक जिंकलं. तर रवीच्या पदरात रौप्यपदक पडलं आहे.