मराठीनंतर IPL मध्ये रश्मिका दाखवणार जलवा; 5 वर्षांनंतर होणार ओपनिंग सेरेमनी

मराठीनंतर IPL मध्ये रश्मिका दाखवणार जलवा; 5 वर्षांनंतर होणार ओपनिंग सेरेमनी

आयपीएल 2023 लवकरच सुरू होणार आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि 4 वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 31 मार्च रोजी या हंगामातील पहिला सामना खेळवला जाणार आहे.
Published on

आयपीएल 2023 लवकरच सुरू होणार आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि 4 वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 31 मार्च रोजी या हंगामातील पहिला सामना खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्या गुजरातची कमान सांभाळणार आहे, तर चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या हाती असेल. यापूर्वी दरवर्षीप्रमाणेच आयपीएलच्या हंगामाचा ओपनिंग सेरेमनी होणार आहे. यामध्ये अनेक स्टार्स आपला जलवा दाखवणार आहेत.

माहितीनुसार, रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटिया या ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करू शकतात. यासोबतच कतरिना कैफ, टायगर श्रॉफ आणि अरिजित सिंग यांचीही नावे कलाकारांच्या यादीत असू शकतात. हा उद्घाटन सोहळा पहिल्या सामन्याआधी होणार असून तो सुमारे ४५ मिनिटे चालणार असल्याचे मानले जात आहे. हा कार्यक्रम अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

तर, शेवटची ओपनिंग सेरेमनी 2018 मध्ये झाला होता. त्यावेळी परिणीती चोप्रा, वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि हृतिक रोशन यांनी परफॉर्म केले होते. फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांच्या सन्मानार्थ ओपनिंग सेरेमनी रद्द करण्यात आली होती. या उद्घाटन सोहळ्यासाठीची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. तेव्हापासून ते कोरोनामुळे आयोजित करण्यात आले नव्हते.

दरम्यान, पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 31 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 2 सामने झाले असून दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातने चेन्नईचा अनुक्रमे 3 आणि 7 गडी राखून पराभव केला. गेल्या मोसमात गुजरातने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते, तर चेन्नई सुपर किंग्जने गुणतालिकेत 10 पैकी 9वे स्थान पटकावले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com