राफेल नदालची यूएस ओपनमधून माघार

राफेल नदालची यूएस ओपनमधून माघार

Published by :
Published on

स्पेनचा महान टेनिसपटू नदालने यूएस ओपनमधून माघार घेण्याची घोषणा केली आहे. पायाच्या दुखापतीमुळे राफेल नदालने मोठा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्याने ही माहिती दिली.

गतविजेता डॉमिनिक थीम आणि पाचवेळा विजेता रॉजर फेडररनेही यंदाच्या यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. ३५ वर्षीय नदालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो म्हणाला, "खरं सांगू, एका वर्षापासून मी माझ्या पायाच्या दुखापतीबद्दल खूप चिंतित आहे आणि मला थोडा वेळ हवा आहे."

तो पुढे म्हणाला, "टीम आणि कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. माझा विश्वास आहे की दुखापतीतून सावरण्याचा हा मार्ग आहे. आत्तासाठी, मी स्वत: वर अजून मेहनत घेणार आहे. माझा असा विश्वास आहे, की पायाची दुखापत बरी होऊ शकते. दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी मी शक्य तितकी मेहनत घेईन." असे तो या व्हिडीओत बोलत होता.

चार वेळा यूएस ओपन चॅम्पियन नदालने विम्बल्डन आणि ऑलिम्पिकमधून माघार घेतली होती. जूनमध्ये फ्रेंच ओपन दरम्यान त्याला दुखापत झाली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com