Australian Open Final 2022 : राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत 21 वं ग्रँडस्लॅम घातलं खिशात
स्पेनच्या राफेन नदाल (Rafael Nadal) याने ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना जिंकत जिंकत 21 वं ग्रँडस्लॅम खिशात घातलं. त्याने इतिहासात सर्वाधिक म्हणजेच 21 ग्रँडस्लॅम मिळवले आहेत.
टेनिसपटू राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला मात देत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच जेतेपद पटकावलं आहे. अतिशय अटीतटीचा झालेला सामना जवळपास पाच तासांहून अधिक काळ चालला. ज्यात पाच सेट्समध्ये राफेलने विजय मिळवला.
सामना राफेलने जिंकला असला तरी डॅनिल याचा खेळही उत्कृष्ट होता. सामन्यात पहिल्या सेटमध्ये डॅनेलने नदालला 6-2 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. दुसरा सेटही डॅनेलने जिंकला पण यावेळी राफेलने कडवी झुंज दिल्यामुळे डॅनिलने 6-7 ने सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही डॅनेल जिंकेल असे वाटत असताना राफेलने कमबॅक करत अप्रतिम खेळ दाखवला आणि सेट 6-4 ने जिंकला. चौथा सेटही 6-4 ने जिंकल्यानंतर अखेरचा निर्णायक सेट राफेलने 7-5 ने खिशात घालत सामन्यासह स्पर्धा जिंकत इतिहास रचला. राफेलने 2-6, 6-7, 6-4, 6-4 आणि 7-5 अशा फरकाने विजय मिळवला.