आयपीएलमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals)आणि राजस्थान रॉयल्स (rajasthan royals)यांच्यात मॅच खेळवण्यात आली. विशेष म्हणजे आयपीएलच्या (IPL) इतिहासात कधी जे घडल नव्हतं ते या सामन्यात घडलं असल्याचे पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्सचा (rajasthan royals) ऑफ-स्पिन अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने (ramachandran ashwin)आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिले अर्धशतक ठोकले. त्याच्या या कामगिरीची चर्चा सध्या क्रिकेट जगतात रंगली आहे. अशातच, अश्विनने स्वतः यासंदर्भात खुलासा केला आहे.
स्वतःच्या खेळीसंदर्भात अश्विनने भाष्य केले आहे. तो म्हणाला, सत्रापूर्वी मला सांगण्यात आले होते की, फलंदाजीसाठी तुला वरच्या क्रमांकावर पाठवण्यात येणार आहे. मी काही अभ्यास मॅचदेखील खेळले होते. ज्यामध्ये मी डावाची सुरुवात केली होती.
या सामन्यात रविचंद्रन अश्विनने 38 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी खेळली. त्यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. मात्र, या सामन्यात त्याची खेळी वाया गेली. कारण, त्याचा संघाला दिल्ली कॅपिटल्सकडून 8 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते जे दिल्ली कॅपिटल्सने 18.1 षटकांत पूर्ण केले आहे.