पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा पराभव करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा पराभव करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. पोर्तुगालच्या संघानं तब्बल 16 वर्षांनंतर म्हणजेच, 2006 नंतर पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. सामन्यात पोर्तुगालनं स्वित्झर्लंडचा 6-1 असा पराभव केला. सामन्याच्या 17व्या मिनिटाला जोआओ फेलिक्सच्या पासवर गोंकालो रामोसनं अप्रतिम गोल केल्यानं पोर्तुगालनं आघाडी घेतली.
2008 नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा रोनाल्डो युरो किंवा विश्वचषकातील कोणत्याही सामन्यात पोर्तुगालच्या सुरुवातीच्या अकरा खेळाडूंचा भाग होऊ शकलेला नाही.पोर्तुगालच्या प्रशिक्षकानं संघाचा स्टार कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोचा सुरुवातीच्या अकरामध्ये समावेश न करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
हाफ टाईमपर्यंत पोर्तुगालचा संघ 2-0 नं आघाडीवर होता. यानंतर 51व्या मिनिटाला रामोसनं डिओगो दलॉटच्या लो क्रॉसचं गोलमध्ये रूपांतर करत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. स्टार फुटबॉलर रोनाल्डो खेळाच्या 72व्या मिनिटाला जोआओ फेलिक्सच्या जागी टाळ्यांच्या कडकडाटात मैदानात आला. मात्र, तोपर्यंत पोर्तुगाल संघानं सामन्यावर गेमवर कब्जा केला होता राफेल लिआयोनं योग्य संधी साधत गोल केला. लियाओच्या गोलमुळे पोर्तुगालनं स्कोअर 6-1 असा केला.