विश्वचषकातील भारताविरुद्धाच्या सामन्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का
सध्या जगभरात क्रिकेटप्रेमी टी 20 विश्वचषकाची वाट बघत आहे. या व विश्वचषकाची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे. मात्र, एकीकडे पावसाचे संकट असताना आता पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानी फलंदाज शान मसूदच्या डोक्याला मार लागला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने अजून अपडेट दिलेलं नाही.
मेलबर्नमध्ये शुक्रवारी 21 ऑक्टोबरला पाकिस्तानी टीम सराव करत होती. त्यावेळी पाकिस्तान टीमचा ऑलराऊंडर मोहम्मद नवाजने एक फटका मारला. हा शॉट थेट शान मसूदच्या डोक्याला जाऊन लागला. डोक्याला बॉल लागल्यानंतर मसूद तिथेच खाली पडला. त्याला इजा झाल्याने त्याला मेलबर्नच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
टीमचा स्टार लेग स्पिनर शादाब खानने पत्रकारांशी चर्चा केली. “मसूदच्या प्राथमिक टेस्टचे रिपोर्ट चांगले आहेत. आता डॉक्टरच्या उत्तराची प्रतिक्षा आहे. चेंडूला त्याचा चुकीच्या जागी लागलाय. आमच्या फिजियोने त्याच्या सुरुवातीच्या टेस्ट केल्या. त्यात तो ओके आहे. आता तो रुग्णालयात आहे. तिथे स्कॅनिंग सुरु आहे. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही सुद्धा प्रार्थना करतोय” असं शादाब खान म्हणाला.