Paris Olympic 2024: 'येथे' लाईव्ह पाहता येईल जगातील सर्वात मोठा ऑलिम्पिक 2024 क्रीडा उत्सव
ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचे 33 वे पर्व पॅरिसमध्ये 25 जुलै ते 11 ऑगस्टमध्ये पार पडणार आहे. चार वर्षांनी भरणाऱ्या क्रीडाकुंभात 200 हून अधिक देशांचे खेळाडू सहभागी झाले आहेत. पॅरिसमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. याआधी 1900 आणि 1924 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन झाले होते. यंदाच्या ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये नसून पहिल्यांदाच नदीवर होणार आहे. पॅरिस शहरातून वाहणाऱ्या सेन नदीवर हा सोहळा होणार आहे.
जगभरातील 10,000हून अधिक स्पर्धक भाग घेणार आहेत. तिरंदाजी, एथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, इक्वेस्ट्रियन, गोल्फ, हॉकी, शूटिंग, सेलिंग, टेबल टेनिस, टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, स्विमिंग, रोव्हिंग, ज्युडो या खेळात भारतीय खेळाडू सहभागी आहे. भारताकडून नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि निखत जरीन यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.
पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात परेड ऑफ नेशन्समध्ये भारत 84व्या क्रमांकावर येईल. उद्घाटन समारंभातील मार्चपास्टला सुरूवात लॉस एंजेलिसमधील 1908 च्या ऑलिम्पिकमध्ये झाला. घरबसल्या तुम्ही हा सोहळा फ्रीमध्ये पाहू शकता. 26 जुलैला रात्री 11 वाजता हा सोहळा सुरु होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 जुलैपर्यंत रात्री 2 वाजेपर्यंत हा सोहळा असणार आहे.
भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता 26 जुलै2024 रोजी पॅरिस ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनी सुरु होईल. लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी तुम्हाला मोबाईल फोनमध्ये रिलायन्स जिओ कंपनीचा जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करावं लागले. जिओ सिनेमाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून लाईव्ह पाहू शकता. उद्घाटन समारंभाला सुमारे 6 लाख लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. पॅरिसमध्ये 80 मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत.