Vinesh Phogat: लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी विनेश फोगटला देणार 25 लाखांचे बक्षीस

Vinesh Phogat: लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी विनेश फोगटला देणार 25 लाखांचे बक्षीस

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) ने कुस्तीपटू विनेश फोगटला 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्यावरून देशभरात चर्चेचे वातावरण आहे. दरम्यान, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) ने कुस्तीपटू विनेश फोगटला 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. विनेश फोगट ही एलपीयू, फगवाडा, पंजाबची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे LPU ने ही घोषणा केली आहे.

विनेश फोगट हिला निर्धारित वजनापेक्षा जास्त केल्यामुळे स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे विनेश फायनलमधून बाहेर तर पडलीच पण पदकही हुकली. तत्पूर्वी दुपारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कुस्तीपटू विनेश फोगटचे काका महावीर फोगट यांची हरियाणातील चरखी दादरी येथे भेट घेतली.

विनेशने उपांत्य फेरीत विजयाची नोंद केली होती. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली महिला ठरली. पहिल्या फेरीपर्यंत विनेश 1-0 ने आघाडीवर होती. त्यानंतर शेवटच्या तीन मिनिटांत तिने क्यूबाच्या कुस्तीपटूवर दुहेरी आक्रमण करत चार गुणांची कमाई केली. ही आघाडी तिने शेवटपर्यंत कायम राखत अंतिम फेरीत धडक मारली. या ऑलिम्पिकमधील विनेशचा प्रवास विलक्षण राहिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com