ऑलिम्पिक 2024
Swapnil Kusale: पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरे पदक; मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेला कांस्यपदक
पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरे पदक मिळाले आहे.
पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरे पदक मिळाले आहे. स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला असून महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्यपदक पटकावलं आहे.
स्वप्नीलने 50 मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर 451.4 इतका होता. चीनचा लिऊ युकुन अव्वल स्थानावर राहिला. त्याचा स्कोर 463.6 होता. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने दुसरा क्रमांक पटकावला.
सुरुवातीला स्वप्नील सहाव्या स्थानी होता. अंतिम फेरीत एकूण आठ स्पर्धक होते. प्रत्येक नेमबाजाला 40शॉट्सची संधी होती. हे शॉट्स पूर्ण झाल्यानंतर सर्वात कमी गुण असलेले दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले. नंतर प्रत्येक एका शॉटनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित होईपर्यंत प्रत्येक 1-1 खेळाडू बाहेर होत गेला.