भारतानं उभारला धावांचा डोंगर; न्यूझीलंडला विजयासाठी 'एवढ्या' धावांचं आव्हान
मुंबई : विराट कोहलीचे 50 वे एकदिवसीय शतक आणि श्रेयस अय्यरच्या शानदार शतकीय खेळाने भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला 398 धावांचे आव्हान दिले आहे.
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनीही संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. रोहित षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तर, शुभमन गिल दुखापत झाल्याने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले
यानंतर कोहली आणि अय्यर यांनी दमदार शतकी खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावांची खेळी खेळली. तर श्रेयस अय्यर 105 धावा करून नाबाद राहिला. अखेरच्या षटकात गिल पुन्हा एकदा फलंदाजीला आला आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताने चार विकेट्सवर 397 धावा केल्या.