न्यूझीलंडच्या माजी दिग्गज खेळाडूला अर्धांगवायूचा झटका

न्यूझीलंडच्या माजी दिग्गज खेळाडूला अर्धांगवायूचा झटका

Published by :
Published on

न्यूझीलंडचा माजी दिग्गज क्रिकेटर ख्रिस कॅर्न्सला आता लकवा म्हणजेच पॅरालीसीसचा अटॅक (Paralysis attack) आला आहे. सध्या ख्रिसला ऑस्ट्रेलियाच्या स्पायनल स्पेशलिस्ट रुग्णालयाता भरती करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

ख्रिस हा ऑस्ट्रेलियामध्ये राहत असून काही दिवसांपूर्वाच त्याला हृदयासंदर्भातील आरोग्य समस्यांमुळे कॅनबरा येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ख्रिसला हृदयासंदर्भातील समस्या असल्याने त्याच्यावर मागील काही बऱ्याच शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या होत्या. पण काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती ठिक झाली होती. तो घरातल्यांची बातचीत देखील करत होता. त्याला घरी देखील पाठवण्यात आले होते. पण आता अचानक त्याला स्पाइनमध्ये स्ट्रोक आल्याने लकवा मारला आहे.

ख्रिस कॅर्न्सचे वकील एरॉन लॉयड यांनी शुक्रवारी मीडियाशी बातचीत करताना ख्रिसच सध्या रुग्णालयात भरती असल्याची माहिती दिली. तसेत त्याच्यासाठी करत असलेल्या प्रार्थनांसाठी चाहत्यांचे धन्यवाद मानले. सोबतच ख्रिसला सध्यातरी पुन्हा ठिक होण्यास काही वेळ लागेल असंही लॉयडने सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com