Asian Games : नेपाळच्या दिपेंद्र सिंगने मोडला रेकॉर्ड, 9 चेंडूत ठोकल्या 50 धावा
नेपाळच्या दिपेंद्र सिंगने भारताच्या युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला आहे. दिपेंद्र सिंग ऐरी या खेळाडूने एशियन गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी करत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड आता दिपेंद्रच्या नावावर केला आहे.
आज (27 सप्टेंबर) एशियन गेम्समध्ये नेपाळ विरुद्ध मंगोलिया टी-20 मॅच सुरू होती. या मॅचमध्ये नेपाळने अगदी जबरदस्त कामगिरी केली. नेपाळने मंगोलिया विरोधात 314 धावा ठोकल्या. टी-20 प्रकारात कोणत्याही टीमने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. T20 मध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडणारी नेपाळ पहिलीच क्रिकेट टीम ठरली आहे.
नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरीने अवघ्या नऊ बॉलमध्ये फिफ्टी करून, भारताच्या युवराज सिंगचा 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. दिपेंद्र दहाच चेंडू खेळला, मात्र यामध्ये त्याने आठ षटकार मारले. तो 52 धावांवर नाबाद राहिला.