नीरज चोप्राचा नवा विक्रम; डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावलं

नीरज चोप्राचा नवा विक्रम; डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावलं

नीरज चोप्राने दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन केलं आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरजनं डायमंड लीग विजेतेपद पटकावले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नीरज चोप्राने दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन केलं आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरजनं डायमंड लीग विजेतेपद पटकावले. नीरजनं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं. या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरजला दुखापत झाली होती.

यामुळं नुकत्याच झालेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थ स्पर्धेला देखील तो खेळू शकला नव्हता.हंगेरीतील बुडापेस्ट येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 साठीही तो पात्र ठरला आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भाला फेकला. यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.18 मीटर भाला फेकला. यानंतर त्यानंतर त्यानं तिसरा थ्रो केलाच नाही. पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com