Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचा सुवर्ण थ्रो; पावो नूरमी गेम्समध्ये जिंकले सुवर्णपदक

Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचा सुवर्ण थ्रो; पावो नूरमी गेम्समध्ये जिंकले सुवर्णपदक

पावो नूरमी गेम्स फिनलंडमधील तुर्कू येथे आयोजित केले जात आहे. यामध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरड चोप्राने मंगळवारी, 18 जून रोजी सुवर्णपदक जिंकले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पावो नूरमी गेम्स फिनलंडमधील तुर्कू येथे आयोजित केले जात आहे. यामध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरड चोप्राने मंगळवारी, 18 जून रोजी सुवर्णपदक जिंकले. वास्ताविक, नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात 85.95 मीटर भालाफेक केली, जी 6 पैकी त्याची सर्वोत्तम थ्रो होती आणि सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 पूर्वी पूर्ण फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. नीरज चोप्रा व्यतिरिक्त फिनलंडचा टोनी केरानेन दुसरा राहिला, ज्याने 84.59 मीटर भालाफेक केली. तर तिसऱ्या क्रमांकावर फिनलंडचा ऑलिव्हर हेलँडर होता, ज्याने 83.96 मी. भाला फेकला.

मंगळवारी झालेल्या भालाफेक स्पर्धेत भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राच्या थ्रोबद्दल बोलताना त्याने पहिल्याच प्रयत्नात 83.62 मीटर भालाफेक केली. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 83.45 मीटर, तिसऱ्या प्रयत्नात 85.97 मीटर आणि चौथ्या प्रयत्नात 82.5 मीटर अंतर पार केले. पाचव्या प्रयत्नात फाऊल झाला, तर सहाव्या प्रयत्नात त्याने 82.97 मी. भाला फेकला. यातील तिसरा थ्रो हा त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला, ज्याची बरोबरी इतर कोणत्याही स्पर्धकाला करता आली नाही आणि नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले.

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने 2022 मध्ये 89.30 मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले, जे त्यावेळचे त्याचे सर्वोत्तम थ्रो होते. यानंतर त्याने 2022 मध्येच डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर अंतरावर भाला फेकला होता. त्यानंतर नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि तेव्हापासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com