Lausanne Diamond League: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा धमाका; डायमंड लीगमध्ये पटकावले दुसरे स्थान

Lausanne Diamond League: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा धमाका; डायमंड लीगमध्ये पटकावले दुसरे स्थान

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. नीरड लुसानेमध्ये सातत्याने अँडरसन पीटर्सच्या मागे राहिला. नीरजली पहिल्या 4 प्रयत्नात चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो चौथ्या स्थानावर धावत होता, परंतू पाचव्या प्रयत्नात त्यानी आपली ताकद दाखवून पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले. मात्र, अंतिम प्रयत्नात नीरजने 89.49 मीटरची सर्वोत्तम थ्रो करुन मोसमातील आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि दुसरा क्रमांक पटकावला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने सहाव्या प्रयत्नात 90.61 मीटरची विक्रमी थ्रो करून विजेतेपद पटकावले. यासह नीरज पुढील महिन्यात होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.

सहाव्या प्रयत्नापर्यंत नीरज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नव्हता. त्याने 82.10 मीटर फेकने सुरुवात केली, परंतु अखेरीस त्याने पॅरिस ऑलिम्पिकमधील 89.45 मीटर फेकणे मागे टाकले. येथेही नीरजला 90 मीटर फेक करता आले नाही जे अँडरसन पीटर्समुळे शक्य झाले. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 87.08 मीटर्स फेक करून तिसरे स्थान पटकावले.

दमदार पुनरागमन करत 85.58 मीटर फेक केली, ती त्यावेळपर्यंतची त्याची सर्वोत्तम थ्रो होती. यासह नीरज तिसऱ्या क्रमांकावर आला. अँडरसनने 82.22 मीटर तर ज्युलियनने पाचव्या प्रयत्नात 80.47 मीटर फेक केली. मात्र, या प्रयत्नात नीरजच्या मागे पडूनही अँडरसन अव्वल स्थानावर राहिला. पाचव्या प्रयत्नात नीरज आघाडीवर राहिला आणि त्याच्यापेक्षा जास्त मीटर्स फेकणारा दुसरा कोणी खेळाडू नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com