Rishabh Pant Latest News
Rishabh Pant Latest News

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्ससाठी खूशखबर! ऋषभ पंत मैदान गाजवणार? NCA कडून मिळालं फिटनेस सर्टिफिकेट

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत मैदानात पुनरागमन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत मैदानात पुनरागमन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. रिकी पॉन्टिंग आणि दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायजीने याबाबत आधीच अधिकृत घोषणा केली आहे. अशात आता याविषयीची मोठी अपडेट आली आहे. रिपोर्टनुसार, आयपीएल २०२४ सुरु होण्याआधीच ऋषभ पंतला बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीकडून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या कार अपघातात ऋषभला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये काही काळ विश्रांती घेतली. पंतच्या पुनरागमनाबाबतही क्रिकेटविश्वात तुफान चर्चा रंगलीय. दरम्यान, ऋषभ पंतने मैदानात सराव सामनाही खेळला असून त्याला आता फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.

इंडिया टुडे रिपोर्टनुसार, एनसीएकडून मागील आठवड्यातच ऋषभ पंतला फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. गतवर्षी आयपीएल हंगामाला मुकलेला ऋषभ पंत आगामी होणाऱ्या आयपीएलच्या प्रचार अभियानाच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे. यासाठी तो काही दिवस दिल्लीत राहणार आहे. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल २०२४ चं हंगाम सुरु होण्याआधी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या शिबिरात सहभागी होणार आहे.

याआधी सौरव गांगुली म्हणाला होता, पंतच्या पुनरागमनासाठी आम्ही घाई करणार नाही आणि त्याचा उत्साह वाढवणार नाही. फिट होण्यासाठी त्याने सर्वकाही केलं आहे. त्यामुळेच एनसीएनं त्याला मंजूरी दिली आहे. त्याचं करिअर खूप मोठं आहे. त्याला आम्ही उत्सहात टाकत नाहीत. ऋषभ कशाप्रकारे प्रतिसाद देतो, ते आम्ही बघणार आहोत. एनसीएकडून मंजूरी मिळाल्यानंतर तो शिबिरात सामील होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com