मुंबईच्या चिमुकलीचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश; थायलंडमध्ये स्केटिंग खेळात घडविला इतिहास
6 वर्षाची चिमुकली, जेष्ठा शशांक पवार हिने स्केटिंग खेळात इतिहास घडविला. थायलंड येथे संपन्न झालेल्या 11 देशांच्या इंडोरन्स वर्ल्ड फेडरेशन इंटरनॅशनल चॅम्पियन्स स्पर्धेत 3 सुवर्णपदक मिळवून तिने भारताकडून झालेली तिची निवड सार्थ ठरविली.
स्केटिंग स्पर्धेच्या 0.20, 1.0, 2.0 मिनिट अशा तिन्ही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करून भारताला 3 सुवर्णपदके मिळवून दिली. तिच्या ह्या नेत्रदीपक यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!! तसेच तिच्या ह्या अतुलनीय यशाचे वाटेकरी तिचे आईवडील, आजीआजोबा यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!!
थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत लोअर परेलच्या 6 वर्षीय जेष्ठा शशांक पवार हिने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत इंडोनेशिया, फिलिपिनिस, श्रीलंकासह 11 देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. जेष्ठा शशांक पवार ही दादर हिंदू कॉलनीतील आयईएस ओरायन शाळेत पहिल्या वर्गात शिकते. स्पीडएक्स स्केटिंग अकादमीत प्रशिक्षक मेहमूद सिद्धीकी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने स्केटिंगची प्रॅक्टिस केली. आता तिला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय यशानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.