Vijay Hazare Trophy | मुंबईने चौथ्यांदा कोरलं विजय हजारे करंडकावर नाव
मराठमोळ्या आदित्य तरेच्या शतकाच्या जोरावर मुंबईने उत्तर प्रदेशवर 6 विकेट्सने राखून धमाकेदार विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने चौथ्यांदा विजय हजारे करंडाकावर आपले नाव कोरले आहे. आदित्य तरेने 118 धावांची नाबाद शतकी खेळी तर कर्णधार पृथ्वी शॉने 73 धावांची खेळी केली.
युपीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत 312 धावांपर्यंत मजल मारली. युपीकडून माधव कौशिकने 158 धावांची दीडशतकी खेळी केली. यामध्ये त्याने 15 चौकार आणि 4 षटकार खेचले. तर समर्थ सिंह आणि अक्षदीप नाथने प्रत्येकी 55 धावांची खेळी केली. मुंबईकडून तनुष कोटीयनने 2 फलंदाजांना बाद केलं. तर प्रशांत सोलंकीने 1 विकेट घेतली.
मुंबईसमोर विजयासाठी 313 धावांचा आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 41.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईकडून आदित्य तरेने 118 धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. तर कर्णधार पृथ्वी शॉने 73 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने महत्वपूर्ण 42 धावा आणि शम्स 36 धावा करुन माघारी परतला.