उद्या मुंबई इंडियन्स भिडणार 'या' परंपरागत प्रतिस्पर्धी संघासोबत
मुंबई: आयपीएल सुरु होऊन आठवडा उलटला नाही. तोच आयपीएलचा जोश सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला असला. तरी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा उत्साह कमी झालेला नाही.
2008 पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने तब्बल 5 हंगाम आपल्या नावावर केले आहेत. हा मुंबई इंडियन्सच्या नावे आयपीएल मधला विक्रम आहे. तर तीनवेळा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचा पराभव केलेला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंटने प्रत्येकी दोन वेळा मुंबईला मात दिलेली आहे. मात्र यंदाही आयपीएल ट्रॉफी मुंबई इंडियन्सच जिंकेल असा विश्वास मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. आठ एप्रिलला मुंबई इंडियन्स प्रतिस्पर्धी चेन्नई सुपरकिंग सोबत लढत होणार आहे.
कधी आणि कुठे होणार सामना?
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना 8 एप्रिल रोजी मुंबईतील येथील वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल.
`मुंबई मेरी जान' या गाण्याच्या थीमवर यंदा मुंबई इंडियन्स थिरकत आहे. सलग तेराव्या सिजनमध्ये रेडिओ सिटी मुंबई इंडियन्सला साथ देत आहे. आयपीएल स्पर्धेतील हा सर्वात रोमांचकारी सामना असेल असं क्रिकेट जाणकारांचं मत आहे.