MI VS KKR: मुंबई इंडियन्सची पुन्हा एकदा पराभव; कोलकाताचा 18 धावांनी विजय, KKR प्लेऑफसाठी पात्र
आयपीएल 2024चा 60वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. हा सामना कोलकाताला ईडन गार्डन मैदानावर झाला. कोलकाताने या सामन्यात त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सला 18 धावांनी पराभव करुन गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले. कोलकाता नाईट रायडर्स 9 विजयाची नोंद करुन 18 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचला, तर मुंबईला 13 सामन्यांमध्ये 9व्या पराभवाला सामोरे जावे लागले.
यासह कोलकाता आयपीएल 2024 सीझनच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. तत्पूर्वी, पावसामुळे सामना 2 तास 15 मिनिटे उशिराने सुरू झाला. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्याने सामना 16-16 असा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यात गोलंदाजांनी वेळ वाया घालवला नाही. केकेआरला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरता आले नाही आणि संघाने 16 षटकांत 7 गडी गमावून 157 धावा केल्या. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने 21 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने प्रत्येकी दोन बळी घेतले.
केकेआरच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली. ओपनिंगला आलेल्या ईशान किशन आणि रोहित शर्मा या दोघांनी चांगली फटकेबाजी करत टीमला मजबूत स्थितीत पोहोचवले. यानंतर आलेला सूर्यकुमार यादव 11 रन्स करुन लगेचच आऊट झाला. तिलक वर्मा याने टीमला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, तो सुद्धा 32 रन्स वर आऊट झाला. यानंतर हार्दिक पांड्या दोन रन, टिम डेविड शून्य, नेहाल वधेरा 3 रन्स, नमन धिर 17 रन्स करुन माघारी परतला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स प्लेइंग 11:
ईशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग 11:
फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.