हार्दिक पांड्याच्या 'या' कारणामुळे मुंबई इंडियन्स संकटात

हार्दिक पांड्याच्या 'या' कारणामुळे मुंबई इंडियन्स संकटात

आयपीएल २०२४ सुरू होण्यासाठी काही महिने राहिले आहे. मात्र मुंबई इंडियन्सच्या टीमवर संकटाचा डोंगर उभा झाला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही.
Published by :
Team Lokshahi
Published on

आयपीएल २०२४ सुरू होण्यासाठी काही महिने राहिले आहे. मात्र मुंबई इंडियन्सच्या टीमवर संकटाचा डोंगर उभा झाला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची दुखापत गंभीर असून आयपीएल पूर्वी तो फिट होणं कठिण आहे. त्यामुळेच त्याला आयपीएल सामना मुकावा लागणार असल्याच समजत आहे.

बांगलादेश विरुद्ध खेळताना हार्दिकला दुखापत:

वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये हार्दिक पांड्या बांगलादेश विरुद्ध खेळताना एक चेंडू रोखायच्या नादात त्याच्या पायाच्या घोट्याला मोठी दुखापत झाली. आजारपणात बराच काळ जाणार असल्याने क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात तो खेळणार नसल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जानेवारीत आफगाणिस्तान विरोधात टी-20 सीरिज होणार आहे. तसेच आयपीएल 2024चे सामनेही होणार आहेत. त्याला टी-20 सीरिज आणि आयपीएलपासूनही दूर राहावे लागणार आहे. हार्दिकला बरे होण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

google

हार्दिक पंड्या आफगाणिस्तानच्या सीरिजसाठी फिट राहणार नाही, असं सांगितलं जात होतं. मात्र, बीसीसीआय किंवा मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com