Surykumar yadav
Surykumar yadav

RCB vs MI | मुंबईचा 'सूर्य' तापला; अर्धशतकी खेळी करत बंगळुरु दिले १५२ धावांचे लक्ष्य

Published by :
Published on

मुंबईच्या सूर्यकुमार यादवने (Surykumar yadav) धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे मुंबईने (Mumbai Indians) बंगळुरुसमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आता बंगळुरु (RCB) हे लक्ष्य पुर्ण करते का ? की मुंबई आपला पहिला विजय मिळवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरसीबीने टॉस जिंकत फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सची चांगली सुरुवात झाली होती. इशन किशन आणि रोहित शर्मा ही जोडी चांगली टीकली होती. मात्र 26 धावांवर रोहित झेल बाद झाला. देवाल्ड ब्रेविसच्या रुपात मुंबईला दुसरा मोठा झटका बसला आहे. देवाल्ड अवघ्या आठ धावांवर तंबूत परतला. इशान किशन २८ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या.चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना तिलक वर्मा बाद झाला.फलंदाज किरॉन पोलार्ड शून्यावर पायचित झाला. रमणदीप सिंग अवघ्या सहा धावा करुन तंबुत परतला. तर सूर्यकुमारने सर्वाधिक ६८ धावा केल्या. या बळावर मुंबईने 151 धावा पुर्ण केल्या होत्य़ा. त्यामुळे आरसीबीसमोर 152 धावांचे लक्ष्य़ होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com