एम एस धोनीचा धमाका! मैदानात पाडला चौकार-षटकारांचा पाऊस, १६ चेंडूत कुटल्या ३७ धावा, पाहा Video
आयपीएल २०१४ च्या १३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीनं आक्रमक फलंदाजी केली. धोनी या हंगामात पहिल्यांदाच फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात धोनीनं चौकार-षटकारांचा पाऊस पाडला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. धोनीनं १६ चेंडूत ३७ धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. २३१ च्या स्ट्राईक रेटने धोनीने धावा केल्या. ४२ वर्षांच्या धोनीची ही वादळी खेळी पाहून संपूर्ण विश्वक्रिकेटमध्ये चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मैदानात उतरताच धोनीनं केली गोलंदाजांची धुलाई
धोनी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला, त्यावेळी चाहत्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. माही-माही असं आवाज देत चाहत्यांनी धोनीच्या नावाचा गजर केला. १७ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर दुबे बाद झाला. त्यानंतर धोनी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला.
इथे पाहा व्हिडीओ
पहिल्या चेंडूवर मारला चौकार
धोनीनं मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर चौकार मारून त्याच्या इनिंगची सुरुवात केली. धोनीनं ज्या अंदाजात फलंदाजी केली, ते पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. विशेष म्हणजे, धोनीनं जेव्हा ऑफ साईडला शॉट मारला, तेव्हा खलील अहमदने त्याचा कॅच सोडला अन् धोनीला जीवदान मिळालं. त्यानंतर धोनीनं आक्रमक फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. धोनीच्या वादळी खेळीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.