IPLच्या महागड्या खेळाडूचा विक्रम मोडला; पॅट कमिन्सला मागे टाकत 'या' खेळाडूवर कोटींची बोली
IPL 2024 Auction : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव आज दुबईमध्ये झाला. यामध्ये पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा प्रकारे पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण त्याचा हा विक्रम तासाभरात मोडला आहे. कमिन्सला मागे टाकत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने महागडा खेळाडू ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. कमिन्सला विकत घेण्यासाठी आरसीबीनेही धडपड केली, पण सनरायझर्सने बाजी मारली. कमिन्सला विकत घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जोरदार बोली युद्ध रंगले होते.
जाणून घ्या आयपीएलच्या इतिहासातील महागड्या खेळाडूंबद्दल
1. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (24.75 कोटी रुपये):
2. ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडू पॅट कमिन्स (20.50 कोटी रुपये)
3. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन (18.50 कोटी रुपये)