World Cup 2023: मिशेल मार्शचा माज, वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर ठेवले पाय; नेटकरी भडकले

World Cup 2023: मिशेल मार्शचा माज, वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर ठेवले पाय; नेटकरी भडकले

'वर्ल्ड कप 2023'चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला.
Published by :
shweta walge
Published on

'वर्ल्ड कप 2023'चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र त्यातील एक फोटो पाहून नेटीझन्स चांगलेच संतापले आहेत.

विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीचा अपमान करताना दिसून आला आहे. त्या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू मिशेल मार्श हा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर पाय ठेवून बसला आहे. हे पाहून हजारो जण या ऑस्ट्रेलियन खेळाडूवर भडकले असून त्याच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे.

हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे की , ऑस्ट्रेलियाचे खेळाडू या ट्रॉफीचे हकदार नाही. तर आणखी एका युजरचं म्हणणं आहे की, ती वर्ल्डकपची ट्रॉफी आहे, त्या ट्रॉफीचा सन्मान करायला हवा.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५४ आणि रोहित शर्माने ४७ धावांची खेळी केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविड हेडने सर्वाधिक १३७ धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com