क्रीडा
मेस्सीच्या अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मारली धडक
कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने नेदरलँडचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने नेदरलँडचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा 4-3 ने पराभव केला. उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियासोबत होणार आहे.
मेस्सी आणि गॅब्रिएल हे आता संयुक्तपणे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारे अर्जेटिंनाचे खेळाडू झाले आहेत. अर्जेंटिनाकडून लिओनल मेस्सी, लॉटारो मार्टिनेझ, गोन्झालो मॉन्टिएल यांनी गोल करण्यास अपयश आले. एन्झो फर्नांडिझ याला अपयश आले. पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँडसला पहिल्या दोन संधीत अपयश आले. लूक जाँग, वूट वेगहार्स्ट, टेन कूपमायनर्स हे गोल करण्यास यशस्वी ठरले.
अर्जेंटिनाच्या अखेरच्या पेनल्टी शूटआऊटवर सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, गोन्झालो मॉन्टिएलने गोल करत अर्जेंटिनाला उपांत्य फेरीत नेले.