LSG VS DC: मॅकगर्कने झळकावले अर्धशतक! दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला 6 विकेट्सने हरवले
आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 6 गडी राखून पराभव करून त्यांची विजयी मालिका थांबवली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 18.1 षटकांत चार गडी गमावून 170 धावा केल्या आणि या मोसमातील आपला दुसरा विजय संपादन केला.
दिल्लीने 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांच्यात पहिल्या विकेटसाठी 24 धावांची भागीदारी झाली, जी यश ठाकूरने मोडली. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने वॉर्नरला (8) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर शॉने चार चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅकगर्कने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. मॅकगर्क आणि ऋषभ पंत यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली, जी नवीन-उल-हकने मोडली. मॅकगर्कने लखनौविरुद्ध 31 चेंडूत अर्धशतक झळकावले.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग 11 :
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक आणि यश ठाकुर.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग 11 :
ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.