Manu Bhaker: भारतीयांची मान अभिमानाने उंचावली! एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर बनली पहिली भारतीय खेळाडू

Manu Bhaker: भारतीयांची मान अभिमानाने उंचावली! एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर बनली पहिली भारतीय खेळाडू

मनु भाकरने चौथ्या दिवशी 30 जुलैला झालेल्या स्पर्धेत तिने सरबजोत सिंगसोबत मिश्र १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारतासाठी दुसर कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारतीय ऑलिम्पियन मनु भाकर ही गोरिया या गावातील आहे, जो हरियाणा या ठिकाणी आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात 2017 च्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपद्वारे केली. यानंतर तिने जागतिक नेमबाजीत आपला ठसा उमटवलेला आहे. मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकवून दिले. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

इतक्यातच मनु भाकरने चौथ्या दिवशी 30 जुलैला झालेल्या स्पर्धेत तिने सरबजोत सिंगसोबत मिश्र १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारतासाठी दुसर कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मनु भाकर आणि सरबजोत सिंगने 580-2x स्कोअर केला आणि ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.

भारताने ऑलिम्पिकमध्ये तब्बल 12 वर्षानंतर पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान मनु भाकरने भारत्याच्या खात्यात पहिलं पदक जमा केलं. चौथ्या दिवशी झालेल्या सरबजोत सिंगसोबत मिश्र १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दोघांनी 20 अचूक नेम लावले आणि पदक मिळवण्यासाठी एन्ट्री मारली. मनु भाकर आणि सरबजोत सिंगने एकत्र मिळून कांस्य पदकासाठी दक्षिण कोरियाच्या नेमबाजांशी सामना केला. दोघंही मिळून ब्रॉन्झ मेडलसाठी स्पर्धा केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com