MS Dhoni: IPL सुरु होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीची फेसबुक पोस्ट चर्चेत
आयपीएल 2024 ला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. आता पुन्हा एकदा धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई मैदानात उतरणार आहे. त्यासाठी चेन्नईच्या खेळाडूंनी कालपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर सराव देखील सुरू केला आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मोठी घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनातील धडधड वाढली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2023 म्हणजे मागच्या वर्षी CSK ने विजेतेपद पटकावले होते.
महेंद्रसिंग धोनीने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, "नव्या सीझनची आणि नवीन भूमिका"ची वाट पाहू शकत नाही. संपर्कात राहा! धोनीच्या फेसबूक पोस्टमुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे. या पोस्टमध्ये धोनीने त्याची नवीन भूमिका कोणती असेल याचा खुलासा केलेला नाही, नव्या भूमिकेत दिसणार असं म्हटल्याने आता धोनी चेन्नईची कॅप्टन्सी सोडणार की काय? की धोनी मेंटॉर म्हणून चेन्नईची संलग्न राहणार त्यामुळे चाहत्यांच्या मनातील सस्पेन्स वाढला आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या सीझनचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर न करता पहिल्या टप्प्याची घोषषा केली असून या पहिल्या टप्प्यात एकूण 17 दिवसांमध्ये 21 सामने पार पडणार आहेत. या पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघाचे किमान 3 आणि जास्तीत 5 सामने होणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सचे 4 सामने होणार आहेत. त्यापैकी पहिले दोन्ही सामने घरच्या मैदानात पार पडतील. चेन्नईचे चारही सामने संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होतील.
महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 332 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. या 332 सामन्यांपैकी भारताने 178 सामने जिंकले आणि 120 सामने गमावले. धोनीने भारतासाठी 90 कसोटी सामने खेळले यात त्याने 4876 धावा केल्या. तसेच 350 वनडे सामन्यामध्ये त्याने 10773 धावा केल्या. त्याने IPL मध्ये 142 कॅच आणि 42 स्टंपिंग केले आहेत.
IPL CSK टीम
MS धोनी (C), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, शेख रशीद, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षणा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली.