श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गज गोलंदाजाने घेतली निवृत्ती
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.मलिंगाने मंगळवारी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणारा मलिंगा आता लीग क्रिकेट खेळणार नाही. मलिंगाने ट्वीट करून म्हटले, "मी आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला निरोप देत आहे. ज्यांनी माझ्या प्रवासात मला साथ दिली त्यांचे आभार. आता मी येत्या काही वर्षांमध्ये माझे अनुभव युवा क्रिकेटपटूंसोबत शेअर करेन.मलिंगा आता लवकरच कोचिंगच्या भूमिकेत येणार आहे.
विक्रम
मलिंगा टी-२० मधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. या महान गोलंदाजाने २९५ टी-२० सामन्यांमध्ये ३९० विकेट्स घेतल्या. मलिंगाचा इकॉनॉमी रेट फक्त ७.०७ होता.मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वेळा हॅट्ट्रिक घेतली, तर सलग ४ विकेट घेण्याचा पराक्रम त्याने दोनदा केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट घेणारा मलिंगा पहिला गोलंदाज आहे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन हॅट्ट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.