चहावाल्याच्या लेकीला रौप्य पदक;  आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत निकिता कमलाकर विजयी

चहावाल्याच्या लेकीला रौप्य पदक; आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत निकिता कमलाकर विजयी

आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या निकिता कमलाकर (nikita kamalakar) हिने रौप्य पदक पटकावले आहे. निकीता ही एक अपंग चहा विक्रेत्याची मुलगी आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत (Asian Youth Weightlifting Championships) कोल्हापूरच्या निकिता कमलाकर (nikita kamalakar) हिने रौप्य पदक पटकावले आहे. निकीता ही एक अपंग चहा विक्रेत्याची मुलगी आहे. तीन वर्षांपू्र्वी खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून प्रकाशात आलेल्या निकिताने गत वर्षीच्या पतियाळा येथील राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

जागतिक स्पर्धेत पदक दूरावल्यामुळे निकिता निराश झाली होती. त्या वेळी तिने आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारच याची ग्वाही दिली होती. तिने आपला शब्द खरा केला, असे तिचे प्रशिक्षक चंदू माळी यांनी सांगितले.दोन्ही पायांनी अपंग असलेले पाडुंरंग सायकलवरून चहा विकतात, तर निकिताची आई अनिता नर्स आहे. आमच्या कोल्हापूरचे नाव तिने उंचावले, अशी भावना तिचे वडिल पांडुरंग यांनी व्यक्त केली.

निकिता ताश्कंद येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ५५ किलो गटात स्नॅचमध्ये ६८ किलो वजनच पेलू शकली. त्यामुळे तिला या प्रकारात सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते; पण तिने क्लीन अँड जर्कमध्ये सर्वाधिक ९५ किलो वजन उचलून गटातील सुवर्णपदक (Gold Medal ) जिंकले

चहावाल्याच्या लेकीला रौप्य पदक;  आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत निकिता कमलाकर विजयी
VIDEO: पहिल्याच डावात Cheteshwar Pujaraनं ठोकलं शतक; जबरदस्त कामगिरी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com