T20 World Cup: 14 पैकी 4 संघांना मिळणार सुपर 8 मध्ये एन्ट्री; भारतासह चार संघांचं तिकिट पक्क, 2 बाहेर; जाणून घ्या संपूर्ण समीकरण
T20 World Cup 2024 Super 8 Scenario : टी-२० वर्ल्डकपचा अर्धा टप्पा जवळपास संपला आहे. याचसोबत सुपर ८ चं चित्रही स्पष्ट झालं आहे. काही संघांनी सुपर ८ मध्ये त्यांची जागा पक्की केली आहे. काही संघ बाहेर झाले आहेत. तर काही संघांना सुपर ८ मध्ये जाण्याची संधी अजूनही कायम आहे.
चार संघांनी सुपर ८ मध्ये केला प्रवेश
टी-२० वर्ल्डकपच्या सुपर ८ मध्ये आातापर्यंत चार संघांनी जागा पक्की केली आहे. भारताने सलग तीन सामने जिंकून सुपर ८ मध्ये क्वालिफाय केलं आहे. ग्रुप बी मधून ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुपर ८ मध्ये प्रेवश केला आहे. ऑस्ट्रेलियानेही तीन सामने जिंकले आहेत. ग्रुप सीमधून वेस्टइंडीज आणि ग्रुप डीमधून दक्षिण आफ्रीकाने सुपर ८ साठी क्वालिफाय केलं आहे.
उर्वरित चार जागांसाठी अनेक संघांमध्ये रस्सीखेच
दोन संघ सुपर ८ च्या रेसमधून बाहेर झाले आहेत. ग्रुप बी मधून नामेबिया आणि ओमानचा संघ बाहेर झाला आहे. सुपर ८ साठी चार जागा शिल्लक आहेत, त्यासाठी अनेक संघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश, यूएसए, स्कॉटलँड, नीदरलँड आणि अफगानिस्तान यांच्यात सुपर ८ साठी रस्सीखेच सुरु आहे. या सर्वांमध्ये अफगानिस्तान मजबूत स्थितीत आहे. अफगानिस्तानने पापुआ न्यू गिनीच्या विरोधात सामना जिंकल्यास ते सुपर ८ मध्ये प्रवेश करतील आणि न्यूझीलंडचा संघ बाहेर होईल.
पाकिस्तानला आर्यलँड विरोधात सामना जिंकणं अनिवार्य आहे. तसच आर्यलँड विरोधात यूएसएच्या संघाचा पराभव झाल्यास पाकिस्तानला फायदा होणार आहे. तसच इंग्लंडबाबतही मोठा पेच आहे. इंग्लंडला सुपर ८ च्या रेसमध्ये राहायचं असेल, तर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडच्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. जर स्कॉटलँडने ऑस्ट्रेलियाला मोठी टक्कर दिली, तर इंग्लंड टूर्नामेंटमधून बाहेर होईल आणि स्कॉटलँड सुपर ८ मध्ये प्रवेश करेल. युएसएला सुपर ८ मध्ये जाण्यासाठी पुढील सामना जिंकावा लागेल. तसच नीदरलँड आणि बांगलादेशही रेसमध्ये कायम आहे.