Kiron Polard
Kiron PolardTeam Lokshahi

IPL 2023 मध्ये पोलार्ड खेळताना दिसणार नाही, मात्र संघाने सोपवली मोठी जबाबदारी

आयपीएल 2023 मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी खेळाडूं नाही तर बॅटींग कोच म्हणून असणार पोलार्ड !
Published by :
Team Lokshahi
Published on

नुकतीच आयपीएल 2023 ची रिटेंशन लिस्ट आली असुन. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या यादीत 'किरोन पोलार्ड'च नाव नसल्यामुळे पोलार्डचे चाहते नाराज झाले होते परंतू मंगळवारी पोलार्डने आयपीएल मधुन निवृत्ती घेत असल्याचे जाहिर करत या वर्षी बॅटींग कॅाच म्हणून असणार असल्याचे सांगितले आहे.

नुकतीच इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 ची मुंबई इंडियन्सची रिटेंशन लिस्ट समोर आली आहे. त्या यादित या वर्षी मुंबई इंडियन्ससाठी पोलार्डसह अजुन काही खेळाडू खेळणार नसल्याचे समोर आले आहे. या वर्षीच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादित पोलार्डसह जयदेव उनाडकट, टायमल मिल्स यांचा समावेश नाही. परंतू पोलार्डने आयपीएल मधून निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले आहे व तो या वर्षी बॅटींग कॅाच म्हणून असणार असल्याचे सांगितले आहे.

Kiron Polard
Kiron Polard Team Lokshahi

किरोन पोलार्डने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे आणि CPL मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सचे नेतृत्व केले असुन पोलार्ड हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. 2010 साली मुंबई इंडियन्सकडून खेळणारा व सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू होता. त्याने या वर्षीच्या आयपीएल हंगामातून निवृत्ती घेतली असल्यामुळे पोलार्ड खेळाडू म्हणून नाही तर आयपीएलमध्ये मुंबई संघाने त्याच्यावर फलंदाजी प्रशिक्षकपद (बॅटींग कॅाच) ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून मैदानात बॅटींग कॅाच म्हणून उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Kiron Polard
Balasaheb Thackeray : संजीवनी करंदीकरांची प्राणज्योत मालवली
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com