कै. एकनाथ साटम जेष्ठ खो-खो कार्यकर्ता गौरव पुरस्कार देऊन सत्कार!
कै. एकनाथ साटम जेष्ठ खो-खो कार्यकर्ता गौरव पुरस्कार नुकताच संपन्न झाला. यामध्ये सहा जणांना कै. एकनाथ साटम जेष्ठ खो-खो कार्यकर्ता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई खोखो संघटनेची द्वैवार्षिक सर्वसाधारण सभा लाल मैदान परळ येथे 30 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली होती. संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार लाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत दोन वर्षाचे अहवाल आणि हिशिबपत्रके मंजूर करण्यात आली.अध्यक्ष शिवकुमार लाड यांच्या हस्ते एकनाथ साटम ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार हा २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन वर्षाकरता सहा जणांना देण्यात आला. पुरस्कार विजेत्यांचा शाल-श्रीफळ, रुपये पाच हजार रूपयांचा धनादेश आणि सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पुरस्कार विजेत्यांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्राचे ज्येष्ठ राष्ट्रीय पंच प्रशिक्षक प्रभाकर वाईरकर, वैभव स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक वैजनाथ श्रीधर वैद्य त्याचप्रमाणे ज्येष्ठ सांखिक तज्ञ आणि अमर हिंद मंडळाचे पदाधिकारी अरुण अनंत देशपांडे या सर्वांचा सन 2019-20 साठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
तर पुष्पराज मोहन बागायत्कर ज्येष्ठ पंच प्रशिक्षक त्याच बरोबर विजय क्लबचे आत्ताचे कार्यवाह आणि संघटनेचे माजी खजिनदार यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्यासोबत अनिल मोरेश्वर टिकारे विद्यार्थी क्रीडा केंद्राचे राज्यस्तरीय खेळाडू आणि संघटनेचे माजी पदाधिकारी आणि सागर भूमी या संस्थेचे संस्थापक भालचंद्र सोमदत्त चांदोरकर ज्यांनी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले होते या सर्वांचा २०२०-२१ या सालासाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या गौरव प्रसंगी पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या संघांचे चाहते आणि संघटनेचे सभासद उपस्थित होते महाराष्ट्र खो खो असोसिएशन तर्फे गंधाली पालांडे हि निरीक्षक म्हणून उपस्थित होती. सभेचे समालोचन राज्य संघटनेचे खजिनदार व सदस्य अॅड. अरुण देशमुख यांनी केले तर संघटनेचे सचिव सुरेंद्र विश्वकर्मा यांनी आभार व्यक्त करून सभा संपल्याचे जाहीर केले.