joe root
joe rootTeam Lokshahi

जो रूटने का दिला इंग्लंडच्या कसोटी टीमचा कर्णधार पदाचा राजीनामा

Published by :
Saurabh Gondhali
Published on

इंग्लंडचा कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार जो रूट (joe root)याने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्यावर सुद्धा भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohali)याच्या प्रमाणे नामुष्की आल्याचे बोलले जात आहे. मागील काही काळापासून त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या कसोटी संघाला चांगला खेळ करता आला नाही. त्यांना ऑस्ट्रेलिया बरोबर झालेली ॲशेस मालिका 4-0 ने गमवावी लागली तर वेस्ट इंडिज बरोबर झालेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये 1-0 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे जो रूटच्या (joe root)कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्याच्या नेतृत्वामध्ये इंग्लंडच्या संघाला गेल्या 17 सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे.

joe root
मुंबईने आठ कोटीत खरेदी केलेल्या या खेळाडूला बाकावर बसवलय

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरच्या माध्यमातून रूटच्या कर्णधारपद सोडण्याची माहिती दिली. इंग्लंडसाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा रुट हा पहिला आहे. त्याने 27 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्वकेले आहे. 2017 मध्ये सर अ‍ॅलिस्टर कूकचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर रूटने संघाला अनेक मालिका विजय मिळवून दिला. ज्यात 2018 मध्ये भारतावर 4-1 तर 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर 3-1 विजयाचा समावेश आहे.

joe root
विराट कोहली- देवदत्त पडिक्कल यांचा हा किस्सा तुम्हाला ठाऊक आहे का?

अ‍ॅलिस्टर कुकनंतर कर्णधार म्हणून 14 शतकांसह जो रुट इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून तो इंग्लंडसाठी सर्वाधिक आणि जगातील 5 वा फलंदाज आहे. रूटच्या पुढे ग्रॅम स्मिथ, अ‍ॅलन बॉर्डर, रिकी पाँटिंग आणि विराट कोहली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com