ICC Chairman: जय शाह होणार आयसीसीचे नवे अध्यक्ष? 'या' व्यक्तीची निवडणुकीतून माघार

ICC Chairman: जय शाह होणार आयसीसीचे नवे अध्यक्ष? 'या' व्यक्तीची निवडणुकीतून माघार

आयसीसीचे पुढील चेअरमन म्हणून जय शाह यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आयसीसीचे पुढील चेअरमन म्हणून जय शाह यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे विद्यमान चेअरमन ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ संपत आहे आणि काल ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दर्शवला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आयसीसीचे पुढील चेअरमन म्हणून जय शाह यांच्याकडे लागल्या आहेत. जय शाह अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहतील की नाही, हे 27 ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल. या तारखेपर्यंत उमेदवार आयसीसी अध्यक्षपदासाठी अर्ज करू शकतात.

ग्रेग बार्कले हे सलग 4 वर्षे आयसीसीचे चेअरमन राहिले आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये ते पहिल्यांदा या पदावर निवडून आल्या. त्यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी या पदाचे सूत्रे स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून आयसीसीचे अध्यक्ष पद रिकामे राहिल. आयसीसीचे नवे अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय शाहने 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री घेतली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. त्यानंतर 2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले.

जय शाह वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीयांनी आयसीसीचं अध्यक्षपद भूषवलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com