टी-२० विश्वचषकाला बुमरा मुकणार का? वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाला टी२० विश्वचषका आधी खूप मोठा धक्का बसला आहे. प्रमुख जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात टी२० मालिका खेळत आहे. जसप्रीत बुमराह टीममधून बाहेर पडणे हे टीम इंडियाला परवडवणारी गोष्ट नाही आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आता तीन आठवडयांहून कमी कालावधी शिल्लक आहे.
यापार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘‘बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकणार नाही. त्याच्या पाठीची दुखापत गंभीर आहे. या दुखापतीमुळे त्याला जवळपास सहा महिने मैदानाबाहेर राहावे लागू शकेल,’’ तसेच ‘‘बुमरा आणि जडेजा हे दोन अनुभवी खेळाडू ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. बुमराला जास्त ताण जाणवू नये यासाठी आम्ही खबरदारी घेतली होती. त्याला आशिया चषकात खेळवणे आम्ही टाळले होते. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठीही तंदुरुस्त होता का, असा आता प्रश्न निर्माण झाला आहे,’’ यासोबतच बुमरा दुखापतीवर उपचार घेण्यासाठी पुन्हा ‘एनसीए’मध्ये दाखल होईल. त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागू शकेल, असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
जसप्रीत बुमराहची जागा मोहम्मद शमी आणि दीपक चाहर बुमराहची जागा घेऊ शकतील असे हे दोन खेळाडू आहेत. मोहम्मद शमीकडे जसप्रीत बुमराह इतकाच अनुभव आहे.तिसरा पर्याय म्हणजे शार्दूल ठाकूर असू शकतो. बुमरावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नसली, तरी त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागणार आहे.