Ishan Kishan: शतक ठोकणे पुरेसे नाही! नियमांचे पालन करणं तितकचं गरजेचं, BCCI कडून ईशान किशनला ताकीद
भारतीय संघाचा फलंदाज आणि विकेटकीपर म्हणून ओळखला जाणारा ईशान किशन बुची बाबू या टूर्नामेंटमध्ये मध्य प्रदेश आणि झारखंड नेतृत्व करताना दिसत आहे. यानंतर तो दुलीप ट्रॉफीमध्ये 5 सप्टेंबरपासून खेळताना दिसणार आहे. ईशान किशनने बुची बाबू टूर्नामेंटमध्ये त्याच्या धमाकेदार शतकांनी गाजवलेली आहे. बुची बाबू टूर्नामेंटमध्ये ईशान किशनने 61 चेंडूत आपले अर्धशतक पुर्ण करतं ईशान किशनने मध्य प्रदेश विरुद्ध 86 चेंडूत शतक झळकावले. मात्र यानंतर ईशान किशनने 25 चेंडूत 50 धावा केल्या.
यावेळी ईशान किशनने 107 बॉलमध्ये 106.54 च्या स्ट्राईक रेटने 114 धावांचा समावेश केला. ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 10 सिक्सचा सामावेश होता. इशआन किशनची ही दमदार खेळी त्याच्या वर्ल्ड कप सिलेक्शनसाठी ठसा उमटवणारी ठरली. मात्र ईशान किशनला BCCI कडून ठोकर मिळाली. ईशान किशनने BCCIच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याला सेंट्रल कॉन्ट्रँक्टमध्ये आणि टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळालं नाही.
एका मुलाखती दरम्यान जय शाहांना एक प्रश्न विचारला गेला होता. तो प्रश्न असा होता की, ईशान किशनला टीम इंडियात पुनरागमन करायचे असेल तर काय करावे लागेल आणि तो कसा येऊ शकतो? या प्रश्नावर प्रत्युत्तर देत BCCI सचिव जय शाह म्हणाले, ईशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळत त्याला नियमांचे पालन करावे लागेल, असं म्हणतं जय शाहा यांनी आपले वक्तव्य स्पष्ट केले. याआधी देखील ईशआन किशनने BCCIच्या नियमांकडे दुर्लक्ष केले होते ज्यामुळे त्याला सेंट्रल कॉन्ट्रँक्टमधून बाहेर काढण्यात आले. किशनने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता जो नोव्हेंबर 2023मध्ये झाला होता. त्या सामन्यात किशन 5 चेंडू खेळून शून्य धावांवर बाद झाला होता.